शतावरी
लॅटिन नाव– Asparagus racemosus
पर्याय- शतमुली, नारायणी, सूक्ष्मपत्रा, वृष्या इ.
शतावरी हे सगळ्यांच्या ओळखीच आयुर्वेदिक औषध आहे पण या औषधाची ओळख आपल्याला फक्त स्त्रिरोगासाठी किंंवा स्त्रियांनी प्रसूती नंतर घ्यायचं औषध एवढीच आहे परंतु हे औषध एवढ्यावरच अजिबात मर्यादित नाही आपल्या केसांपासून त्वचेपर्यन्त आणि शरीराच्या सगळ्या संस्थांवर खूप चांगल कार्य करणार औषध आहे.
शतावरी गुरु शिता तिक्ता स्वादू रसायनी|
मेधा अग्नी पुष्टदा स्निग्धा नेत्र्या गुल्म अतिसारजित्
शुक्रस्तन्यकरी बल्या वातपित्तशोथस्रजित् |
महाशतावरी हृदया वृष्या रसायनी
शितवीर्या निहंती अर्शो ग्रहणी नयन आमयान || भा.प्र. निघंटू
शतावरी बल्या शुक्रजननी प्रजास्थापनी च | च. स
.
आयुर्वेदानुसार शतावरीचा कोणकोणत्या आजारात कसा उपयोग करू शकतो ते आपण बघू .
मेध्या- ‘ मेधां वर्धयती’ ,शतावरी ही बुद्धी चे पोषण करणारी आहे त्यामुळे तिचा उपयोग मानसरोगांमध्येही केला जातो. शरीरातील ओज कमी झाल्यामुळे अनेक प्रकार चे मानस रोग होतात आणि शतावरी ओज वाढवणारी असल्यामुळे मानसरोगात उपयुक्त आहे.
नेत्र्या – नेत्ररोगात विशेषतः पित्तज नेत्ररोगात शतावरी चा उपयोग होतो.
बल्या – शतावरी सगळ्या धातूंचे वर्धन करून शरीरबल वाढवण्याचे कार्य करते आणि ही गुरु आणि स्निग्ध गुणांची असल्याने मांस आणि मेद धातू ची पुष्टी करून शरीरपुष्टी करते .
ज्वर – जीर्ण ज्वरामधे शतावरी उपयुक्त आहे तसेच दौर्बल्यामधे येणाऱ्या ज्वरामधे शतावरी घृत फार उपयोगी पडते.
अम्लपित्त – छातिमधे दाह होने , मळमळ होने अश्या लक्षणांमधे तसेच अम्लपित्तामुळे पोटात अल्सर झाला असल्यास शतावरीचा फार छान उपयोग होतो.
अतिसार – विशेषतः पित्तज अतिसारामध्ये शतावरी उपयोगी पडते. अतिसारामध्ये ज्वर, तृष्णा ,रक्तस्त्राव अशी लक्षणे असल्यास शतावरी दुधासोबत घेणे किंवा शतावरी घृत घेणे त्वरित उपयोगी ठरते.
मुत्राजविकार – वेदनायुक्त किंवा दाहायुक्त मूत्रप्रवृत्ती
असल्यास शतावरी काढा मध आणि साखरेसोबत घेतल्यास उपयोग होतो.
स्त्रिरोग – स्त्रियांच्या आर्तवामध्ये दोष असल्यास विशेषतः पित्तज दोष असल्यास शतावरी सेवनाने लाभ होतो. तसेच प्रजास्थापन म्हणजे गर्भधारणेसाठी शतावरी उपयोगी आहे.
संधिविकार – वातप्रकोपामुळे तसेच धातुक्षयामुळे जे वातविकार होतात त्यामध्ये हाडांची झिज होऊन वेदना होतात त्यात झिज भरून येण्यासाठी , वेदना कमी होण्यासाठी व मांसपेशीना बल देण्यासाठी शतावरी खूप फायदेशीर आहे.
शुक्रजननी – शतावरी चूर्ण तूप आणि मधासोबत घेतल्याने शुक्रकर आहे तसेच रसायन म्हणूनही कार्य करते .शतावरी घृतही शुक्र वाढवण्यास मदत करते .
अश्याप्रकारे शतावरी आपल्या रस ,विर्य आणि विपाकामुळे सर्व धातूंचे वर्धन करते विशेषतः रस, मांस ,शुक्र या धातूंचे वर्धन करते तसेच हृदयाचे सुद्धा तर्पण आणि पोषण करते .मधुर तिक्त रसामुळे तसेच शीत वीर्यामुळे रस व रक्तगत पित्ताचे शमन व प्रसादन करते.
या लेखाचा उद्देश आयुर्वेदिक औषधांची उपयुक्त माहिती देणे हा आहे.
- शतावरी हे औषध म्हणून घेण्यापूर्वी तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेणे चांगले आहे कारण प्रत्येक औषधाचे प्रमाण आणि उपयोग हा प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, लक्षणे यानुसार वेगवेगळा होतो.